1 Reis 20

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बतीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले.
1 E Ben-Hadade, o rei da Síria, reuniu todo o seu exército; e havia trinta e dois reis com ele, e cavalos, e carruagens; e ele subiu e sitiou Samaria, e guerreou contra ela.
2 इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला.
2 E ele enviou mensageiros a Acabe, rei de Israel, para dentro da cidade, e disse-lhe: Assim diz Ben-Hadade:
3 संदेश असा होता, “बेन-हादाचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.”‘
3 A tua prata e o teu ouro são meus; as tuas esposas também e os melhores de teus filhos são meus.
4 यावर इस्राएलच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
4 E o rei de Israel respondeu, e disse: Ó rei meu senhor de acordo com o teu dizer, eu sou teu, e tudo o que tenho.
5 अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस.
5 E os mensageiros retornaram, e disseram: Assim falou Ben-Hadade, dizendo: Embora eu tenha mandado a ti, dizendo: Tu me entregarás a tua prata, e o teu ouro, e as tuas esposas, e os teus filhos;
6 उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.”
6 mesmo assim enviarei os meus servos a ti amanhã por volta desta hora, e eles procurarão na tua casa, e nas casas dos teus servos; e será que tudo o que for agradável aos seus olhos, eles porão em suas mãos, e retirarão.
7 तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन - हदाद हा विघ्र आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने - चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”
7 Então, o rei de Israel chamou todos os anciãos da terra, e disse: Notem, rogo-vos, e vede como este homem procura o mal; porque enviou-me pelas minhas esposas e meus filhos, e pela minha prata, e pelo meu ouro; e eu não lhos neguei.
8 यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
8 E todos os anciãos e todo o povo disseram a ele: Não atentes a ele, tampouco consintas.
9 तेव्हा अहाबने बेन - हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेच मी पालन करु शकत नाही.”बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला.
9 Porquanto disse aos mensageiros de Ben-Hadade: Dizei ao meu senhor, o rei: Tudo o que mandaste ao teu servo na primeira vez, fá-lo-ei; mas isto não posso fazer. E os mensageiros partiram, e lhe trouxeram novamente palavra.
10 तेव्हा बेन - हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.”
10 E Ben-Hadade mandou dizer a ele: Os deuses assim me façam, e ainda mais, se o pó de Samaria, em punhados, for suficiente para todo o povo que me segue.
11 अहाब राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेनहदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.”
11 E o rei de Israel respondeu e disse: Dizei-lhe: Que aquele que se cinge das armas não se glorie como aquele que se solta.
12 राजा बेन - हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.
12 E sucedeu, quando Ben-Hadade ouviu esta mensagem, enquanto ele e o rei estavam bebendo nos pavilhões, disse aos seus servos: Ponde-vos em formação. E eles se puseram em formação contra a cidade.
13 त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पारभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.”
13 E, eis que veio ali um profeta até Acabe, rei de Israel, dizendo: Assim diz o SENHOR: Tens tu visto toda esta grande multidão? Eis que a entregarei à tua mão neste dia; e tu saberás que eu sou o SENHOR.
14 अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?”तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.”यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?”“तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
14 E Acabe disse: Por quem? E ele disse: Assim diz o SENHOR: Justamente pelos moços dos príncipes das províncias. Então, ele disse: Quem ordenará a batalha? E ele respondeu: Tu.
15 तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
15 Então, ele enumerou os moços dos príncipes das províncias, e eles eram duzentos e trinta e dois; e, depois deles, ele enumerou todo o povo, todos os filhos de Israel, sendo sete mil.
16 राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला.
16 E eles saíram ao meio-dia. Ben-Hadade, no entanto, estava se embriagando nos pavilhões, ele e os reis, os trinta e dois reis que o ajudaram.
17 तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले.
17 E os moços dos príncipes das províncias saíram primeiro; e Ben-Hadade mandou verificar, e eles lhe contaram, dizendo: Há homens vindos de Samaria.
18 तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
18 E ele disse: Se eles saíram em paz, trazei-mos vivos; ou se saíram em guerra, trazei-mos vivos.
19 राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते.
19 Assim, estes jovens dos príncipes das províncias saíram da cidade, e o exército que os seguia.
20 प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अराममधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला.
20 E eles mataram, cada qual, o seu homem; e os sírios fugiram; e Israel os perseguiu; e Ben-Hadade, o rei da Síria, escapou em cima de um cavalo, com os cavaleiros.
21 राजा अहाबने सेनेचे नेतृत्व करुन अरामच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामचा दारुन पारभव झाला.
21 E o rei de Israel saiu, e feriu os cavalos e carruagens, e matou os sírios com um grande massacre.
22 यानंतर तो संदेष्टा राजा अहाबकडे गेला आणि म्हणाला, “अरामचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.”
22 E o profeta veio até o rei de Israel, e disse a ele: Vai, fortalece-te e atenta, e vê o que fazes; pois ao retorno do ano, o rei da Síria subirá contra ti.
23 राजा बेन - हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू.
23 E os servos do rei da Síria disseram a ele: Os seus deuses são deuses dos outeiros; por isso, eles foram mais fortes do que nós; mas lutemos contra eles na planície, e seguramente seremos mais fortes do que eles.
24 आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा.
24 E faze isto: Retira os reis, cada qual do seu lugar, e põe capitães no lugar deles;
25 “जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
25 e enumera para ti um exército, semelhante ao exército que perdeste, cavalo por cavalo, e carruagem por carruagem; e lutaremos contra eles na planície, e, seguramente, seremos mais fortes do que eles. E ele deu ouvidos à sua voz, e assim o fez.
26 वसंत ऋतुत बेनहदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
26 E sucedeu, ao retorno do ano, que Ben-Hadade enumerou os sírios, e subiu até Afeque, para lutar contra Israel.
27 इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
27 E os filhos de Israel foram enumerados, e estavam todos presentes, e foram contra eles; e os filhos de Israel se acamparam diante deles como dois pequenos rebanhos de cabritos; mas os sírios enchiam a terra.
28 एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.
28 E veio ali um homem de Deus, e falou ao rei de Israel, e disse: Assim diz o SENHOR: Como os sírios disseram: O SENHOR é Deus dos outeiros, mas não é Deus dos vales, por isso, entregarei toda esta grande multidão na tua mão, e saberás que eu sou o SENHOR.
29 दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकंानी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.”
29 E eles acamparam um diante do outro por sete dias. E assim foi, que no sétimo dia a batalha foi travada; e os filhos de Israel mataram, dos sírios, cem mil homens de pé, em um dia.
30 जे बाचवले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता.
30 O restante, porém, fugiu para Afeque, para dentro da cidade; e ali uma muralha caiu sobre vinte e sete mil dos homens que restaram. E Ben-Hadade fugiu, e entrou na cidade, dentro de uma câmara interna.
31 त्याचे सेवक त्याला म्हणाले, ‘इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळूनइस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.”
31 E os seus servos disseram a ele: Eis que, agora, ouvimos que os reis da casa de Israel são reis misericordiosos; rogo-te que ponhamos panos de saco sobre os nossos lombos, e cordas sobre as nossas cabeças, e saiamos ao rei de Israel; porventura ele salve a tua vida.
32 त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे.”‘अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊचआहे.”
32 Assim, eles cingiram os lombos de panos de saco, e puseram cordas sobre as suas cabeças, e vieram até o rei de Israel, e disseram: O teu servo, Ben-Hadade, diz: Suplico-te que me deixes viver. E ele disse: Ele ainda está vivo? Ele é meu irmão.
33 बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.”अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
33 Ora, os homens observaram diligentemente se qualquer coisa viria da parte dele, e, rapidamente a apreendiam; e disseram: O teu irmão, Ben-Hadade. Então, ele disse: Ide e trazei-mo. Então, Ben-Hadade veio até ele; e fez com que ele subisse na carruagem.
34 बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील”अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.
34 E Ben-Hadade lhe disse: As cidades que o meu pai tomou do teu pai, restituí-las-ei; e farás ruas para ti em Damasco, como o meu pai fez em Samaria. Então, disse Acabe: Despedir-te-ei com este pacto. Assim, ele fez um pacto com ele, e o despediu.
35 एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले.
35 E um certo homem dos filhos dos profetas disse ao seu próximo, pela palavra do SENHOR: Fere-me, rogo-te. E o homem se recusou a feri-lo.
36 तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.
36 Então, ele disse ao homem: Como não obedeceste à voz do SENHOR, eis que tão logo partires de mim, um leão te matará. E, assim que ele partiu, um leão o encontrou, e o matou.
37 मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले.
37 Depois, ele encontrou um outro homem e lhe disse: Fere-me, rogo-te. E o homem o feriu, de modo que ao ferir-lhe, ele o machucou.
38 त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला.
38 Assim, o profeta partiu, e esperou o rei junto ao caminho, e disfarçou-se com cinzas sobre a face.
39 राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, “याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.
39 E, quando o rei por ali passava, ele gritou ao rei, e disse: O teu servo saiu para o meio da batalha; e, eis que, um homem se virou para o lado, e me trouxe um homem, e disse: Cuida deste homem; se, de algum modo, ele vier a faltar, a tua vida será pela vida dele, ou, de outro modo, pagarás um talento de prata.
40 पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.”यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
40 E, enquanto o teu servo esteve ocupado, aqui e acolá, ele se foi. E o rei de Israel disse a ele: Assim há de ser o teu juízo; tu mesmo o decidiste.
41 आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले.
41 E ele se apressou, e removeu as cinzas da face; e o rei de Israel reconheceu que ele era dos profetas.
42 मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.”
42 E ele lhe disse: Assim diz o SENHOR: Porque deixaste escapar da tua mão um homem ao qual indiquei para a total destruição, por isso, a tua vida irá pela vida dele, e o teu povo pelo povo dele.
43 यानंतर राजा शोमरोनला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.
43 E o rei de Israel foi para a sua casa revoltado e aborrecido, e veio até Samaria.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Reis 20, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.