1 Crônicas 26

Marathi Bible (GL_MARATHI) vs ARC

Sair da comparação
ARC Almeida Revista e Corrigida 2009
1 द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या घराण्यातील होते. त्यांची नावे अशी: मेशेलेम्या आणि त्याची मुलेबाळे. (आसाफच्या कुळातील कोरहचा हा मुलगा.)
1 Quanto às divisões dos porteiros, dos coraítas foi Meselemias, filho de Coré, dos filhos de Asafe.
2 मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा
2 E foram os filhos de Meselemias: Zacarias, o primogênito, Jediael, o segundo, Zebadias, o terceiro, Jatniel, o quarto,
3 अलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
3 Elão, o quinto, Joanã, o sexto, Elioenai, o sétimo.
4 आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
4 E os filhos de Obede-Edom foram: Semaías, o primogênito, Jeozabade, o segundo, Joá, o terceiro, Sacar, o quarto, Natanael, o quinto,
5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमवर खरोखच कृपादृष्टी होती.
5 Amiel, o sexto, Issacar, o sétimo, Peuletai, o oitavo; porque Deus o tinha abençoado.
6 शमाया हा ओबेद-अदोमचा मोठा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे चांगले कणखर योध्दे असल्यामुळे त्यांची आपल्या पितृकुळावर सत्ता होती.
6 Também a seu filho Semaías nasceram filhos, que dominaram sobre a casa de seu pai; porque foram varões valentes.
7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशाल होते.
7 Os filhos de Semaías: Otni, e Rafael, e Obede, e Elzabade, com seus irmãos, homens valentes, Eliú e Semaquias.
8 हे सर्व ओबेद-अदोमचे वंशज त्याची मुले, नातेवाईक असे सर्वच पुरुष पराक्रमी होते. ते सावध पहारेकरी होते. ओबेद - अदोमचे एकंदर 62वंशज होते.
8 Todos esses foram dos filhos de Obede-Edom; eles, e seus filhos, e seus irmãos, homens valentes de força para o ministério, por todos, sessenta e dois.
9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
9 E os filhos e os irmãos de Meselemias, homens valentes, foram dezoito.
10 मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता.
10 E de Hosa, dentre os filhos de Merari, foram seus filhos: Sinri, o chefe (ainda que não era o primogênito, contudo seu pai o constituiu chefe),
11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
11 Hilquias, o segundo, Tebalias, o terceiro, Zacarias, o quarto; todos os filhos e irmãos de Hosa foram treze.
12 द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते.
12 Destes se fizeram as turmas dos porteiros, entre os chefes dos homens da guarda, igualmente com os seus irmãos, para ministrarem na Casa do Senhor .
13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
13 E lançaram sortes, assim os pequenos como os grandes, segundo as casas de seus pais, para cada porta.
14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली.
14 E caiu a sorte do oriente a Selemias; e lançou-se a sorte por seu filho Zacarias, conselheiro prudente, e saiu-lhe a sorte do norte.
15 ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले.
15 E a Obede-Edom, a do sul; e a seus filhos, a casa das tesourarias.
16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली.पहारेकरी एकमेकांलगत उभे असत.
16 A Supim e Hosa, a do ocidente, com a porta Salequete, junto ao caminho da subida; uma guarda defronte de outra guarda.
17 पूर्व दरवाजावर सहा लेवी, उत्तर दरवाजावर चार लेवी, दक्षिण दरवाजावर चार जण, भांडाराच्या रक्षणासाठी दोन लेवी दिवसभर सतत पहारा देत.
17 Ao oriente estavam seis levitas; ao norte, quatro por dia; ao sul, quatro por dia; porém às tesourarias, de dois em dois.
18 पश्मिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत. आणि त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन रक्षक असत.
18 Em Parbar, ao ocidente, quatro junto ao caminho, dois junto a Parbar.
19 कोरह आणि मरारी यांच्या घराण्यातील द्वाररक्षकांच्या गटांची यादी पुढीलप्रमाणे:
19 Estas são as turmas dos porteiros dentre os filhos dos coraítas e dentre os filhos de Merari.
20 अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवात चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.
20 E , quanto aos levitas, Aías tinha cargo dos tesouros da Casa de Deus e dos tesouros das coisas sagradas.
21 लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक.
21 Quanto aos filhos de Ladã, gersonita, foi chefe dos pais Jeieli,
22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे. परमेश्वराच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
22 dos filhos de Jeieli: Zetã e Joel, seu irmão; estes tinham cargo dos tesouros da Casa do Senhor ;
23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
23 dos anramitas, dos izaritas, dos hebronitas, dos ozielitas,
24 अबुएल हा परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावरचा नायक म्हणून नेमला गेला. अबुएल गेर्षोनचा मुलगा. गेर्षोम मोशेचा मुलगा.
24 Sebuel, filho de Gérson, o filho de Moisés, era maioral dos tesouros;
25 अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडून: रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ.
25 e seus irmãos foram, da banda de Eliézer, Reabias, seu filho, e Isaías, seu filho, e Jorão, seu filho, e Zicri, seu filho, e Selomite, seu filho.
26 दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.
26 Este Selomite e seus irmãos tinham cargo de todos os tesouros das coisas sagradas que o rei Davi, e os chefes dos pais, capitães de milhares, e de centenas, e capitães do exército tinham consagrado;
27 यापैकी काही युध्दात मिळालेली लूट होती. ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी देऊन टाकली.
27 dos despojos das guerras as consagraram, para repararem a Casa do Senhor ,
28 शमुवेल हा द्रष्टा, कीशचा मुलगा शौल आणि नेरचा मुलगा अबनेर, सरुवेचा मुलगा यवाब यांनी परमेश्वराला दिलेल्या पवित्र वस्तूंची देखभालही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
28 como também tudo quanto tinha consagrado Samuel, o vidente, e Saul, filho de Quis, e Abner, filho de Ner, e Joabe, filho de Zeruia; tudo quanto qualquer tinha consagrado estava debaixo da mão de Selomite e seus irmãos.
29 कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत.
29 Dos izaritas, Quenanias e seus filhos foram postos sobre Israel para a obra de fora, por oficiais e por juízes;
30 हशब्या हा हेब्रोन घराण्यातला. यार्देन नदीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या इस्राएलच्या भूमीवरील परमेश्वराचे कार्य आणि राज्याचा कारभार हशब्या आणि त्याचे भाऊबंद पाहात असत. या गटात 1,700 शूर वीर होते.
30 dos hebronitas, foram Hasabias e seus irmãos, homens valentes, mil e setecentos, que tinham cargo dos ofícios em Israel, daquém do Jordão para o ocidente, em toda obra do Senhor e para o serviço do rei;
31 हेब्रोन घराण्याच्या इतिहासावरुन असे दिसते की यरीया हा त्यांचा प्रमुख होता. चाळीस वर्षे राज्य केल्यावर दावीदाने जेव्हा शूर आणि कसबी पुरुषांचा शोध घेतला तेव्हा गिलाद मधल्या याजेर नगरात त्याला हेब्रोन घराण्यांत अशी माणसे आढळली.
31 dos hebronitas, era Jerias o chefe dos hebronitas, de suas gerações entre os pais; no ano quarenta do reino de Davi, se buscaram e acharam entre eles varões valentes em Jazer de Gileade.
32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे असे 2,700 नातलग यरीयाला होते. परमेश्वराचे कार्य आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धावंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2,700 जण दावीदाने नेमले.
32 E seus irmãos, homens valentes, dois mil e setecentos, chefes dos pais; e o rei Davi os constituiu sobre os rubenitas, e os gaditas, e a meia tribo dos manassitas, para todos os negócios de Deus e para todos os negócios do rei.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 26, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.