1 Crônicas 10

Marathi Bible (GL_MARATHI) vs BKJ

Sair da comparação
1 पलिष्टी इस्राएल लोकांशी लढले. इस्राएल लोकांनी पळ काढला. गिलबोवा डोंगरात बरेच इस्राएल लोक मारले गेले.
1 Ora, os filisteus lutaram contra Israel; e os homens de Israel fugiram de diante dos filisteus, e caíram mortos no monte Gilboa.
2 पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे मुलगे यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी मारले.
2 E os filisteus perseguiram com afinco Saul e os seus filhos; e os filisteus mataram os filhos de Saul; Jônatas, Abinadabe, e Malquisua.
3 शौलाच्या त्यांनी तीव्र मारा केला. धनुष्यबाणांनी वेध घेऊन त्याला सैन्याने जायबंदी केले.
3 E a batalha se intensificou contra Saul, e os arqueiros o atingiram; e ele foi ferido pelos arqueiros.
4 तेव्हा आपल्या शस्त्रवाहकाला शौल म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि ती माझ्यावर चालव. नाहीतर हे उपरे येऊन माझी विटंबना करतील.”पण शौलाच्या या शस्त्रवाहकाचा धीर झाला नाही. त्याने शौलाला मारण्यास नकार दिला. तेव्हा शौलाने स्वत:ची तलवार स्वत:ला मारण्यासाठी वापरली. तो स्वत:तलवारीच्या टोकावर पडला.
4 Então, disse Saul ao seu escudeiro: Desembainha a tua espada, e atravessa-me com ela; para que não venham estes incircuncisos ultrajar-me. Porém, o seu escudeiro não quis fazê-lo; porque ficou mui temeroso. Assim, Saul tomou uma espada, e caiu sobre ela.
5 शौल मरण पावलेला पाहून शस्त्रवाहाकाने तलवार उपसून त्यावर पडला व स्वत:चा जीव घेतला.
5 E, quando o seu escudeiro viu que Saul estava morto, ele caiu de modo semelhante sobre a espada, e morreu.
6 अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन मुलगे यांना मरण आले. शौलाच्या कुटुंबाला एकदमच मृत्यू आला.
6 Assim, Saul morreu, e os seus três filhos, e toda a sua casa morreram juntos.
7 आपल्या सैन्याने पळ काढला आहे. तसेच शौल आणि त्याचे मुलगे मेले हे खोऱ्यात राहणाऱ्या इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनीही आपली घरेदारे सोडून पळ काढला. इस्राएल लोकांनी सोडलेल्या त्या नगरामध्ये पलिष्टी आले आणि तेथेच राहू लागले.
7 Todos os israelitas que estavam no vale, vendo que os filhos de Israel recuavam e que Saul e os seus filhos estavam mortos, abandonaram as suas cidades e fugiram; e vieram os filisteus e nelas habitaram.
8 दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले.
8 E sucedeu, ao amanhecer, quando os filisteus vieram para despir os mortos, que encontraram Saul e os seus três filhos caídos no monte Gilboa.
9 शौलाच्या देहावरील वस्तू त्यांनी घेतल्या. त्याचे मस्तक आणि चिलखत लांबवले. हे वर्तमान आपल्या दैवतांना आणि लोकांना कळवायला त्यांनी देशभर दूत रवाना केले.
9 E quando o tinham despido, tomaram a sua cabeça, e a sua armadura, e as enviaram para a terra dos filisteus, para anunciar as novas para os seus ídolos, e ao povo.
10 पलिष्ट्यांनी शौलाचे चिलखता आपल्या देवळात आणि शिर दागोनच्या देवळात टांगले.
10 E eles colocaram a sua armadura na casa dos seus deuses, e prenderam a sua cabeça no templo de Dagom.
11 पलिष्ट्यांच्या या कृत्याची वार्ता याबेश गिलाद नगरातील लोकांच्या कानावर गेली.
11 E, quando todo o Jabes-Gileade ouviu tudo o que os filisteus haviam feito a Saul,
12 तेव्हा त्यांच्यातील शूर माणसे शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश गिलाद येथे आणले. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.
12 levantaram-se, todos os homens valentes, e removeram o corpo de Saul, e os corpos dos seus filhos, e os trouxeram para Jabes, e sepultaram os seus ossos debaixo do carvalho de Jabes, e jejuaram sete dias.
13 परमेश्वराशी प्रामाणिक नसल्याने शौलाला मरण आले. शौलाने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले.
13 Assim, Saul morreu pela sua transgressão, que ele cometeu contra o SENHOR, a saber, contra a palavra do SENHOR, a qual ele não guardou, e também por pedir conselho a uma que tinha um espírito familiar, ao consultá-la;
14 शिवाय परमेश्वराला विचारण्याऐवजी भूतविद्या जाणणाऱ्या बाईकडे जाऊन त्याने सल्ला विचारला. म्हणून परमेश्वराने शौलाला मृत्युदंड दिला आणि इशायाचा मुलगा दावीद याला राज्य दिले.
14 e não consultou o SENHOR; portanto ele o matou, e transferiu o reino para Davi, o filho de Jessé.

Ler em outra tradução

Comparar com outra

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.