Gênesis 7

प्रेम संदेश (AHR)

1 मंग परमेश्वरनी नोहाले सांगं, "तु आपला सर्वा कुटुंबनासंगे तारूमा जाय; कारण मी दखेल शे की, हाई पिढीमा तुच मनासमोर नितीमान शे.

2 सर्वा शुध्द पशुमातीन नरमादी सात सात अनी अशुध्द पशुपाईन दोन दोन संगे ले

3 अनी आकाशमाधला पक्षीमातीन नरमादी सात सात संगे ले; म्हणजेच त्यानामुये पृथ्वीवर त्यासनं जाती टिकी राही.

4 अजुन सात दिनना अवकाश शे; मंग मी पृथ्वीवर चाळीस दिन अनं चाळीस रात पाणी पाडसु, अनी मी बनाडेल जमीनवरनं सर्वकाही नष्ट करसु."

5 तवय नोहानी परमेश्वरनी सांगेल प्रमाणे सर्वकाही करं.

6 पृथ्वीवर जलप्रलय व्हयना त्या येळले नोहा सहाशे वरीसना व्हता.

7 काईननं वंशजहाऊ जलप्रलय जोडे वना म्हणीसन नोहा त्याना पोऱ्या, बायको अनं सुनासले लिसन तारूमा गया.

8 शुध्द अनं अशुध्द पशुपक्षी अनं जमीनवर रांगनारा सर्वा प्राणी यासमाईन,

9 नर अनं मादी अश जोडीजोडीतीन, देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे त्या तारूमा त्यानाकडे गयात.

10 सात दिननंतर प्रलयनं पाणी पृथ्वीवर वनं.

11 नोहा सहाशे वयना व्हता तवय दुसरा महिनाना सतरावा दिनले महाजलाशयना सर्वा झरा फुटनात अनी आकाशना दार उघडी गयात.

12 चाळीस दिन अनं चाळीस रात पाऊसनी झडी लाई.

13 याच दिनले नोहा, अनी त्याना पोऱ्या शेम, हाम, अनं याफेथ, त्यासनासोबत नोहानी बायको अनं त्याना तिनी सुना बी तारूमा गयात.

14 त्या सगया अनी प्रत्येक जातीना वनपशु, प्रत्येक जातीना ग्रामपशु, प्रत्येक जातीना रांगनारा प्राणी अनं प्रत्येक जातीना उडनारा पक्षी अनी सर्व जातीना पक्षी बी तारूमा गयात.

15 सर्वा देहधारी प्राणीस पाईन एक एक नोहाना जोडे तारूमा गयात.

16 देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे सर्वा देहधारी प्राणीसमातीन एक एक नरमादी तारूमा गयात; मंग परमेश्वरनी तारूनं दार बंद करं.

17 पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिन अनं चाळीस रात चालना, अनी पाणी वाढामुये तारू जमीन सोडीसन पाणीवर तरंगु लागना.

18 जलप्रलय व्हईसन पृथ्वीवर पाणी भलतच वाढनं अनी तारू पाणीना वरला भागवर तरंगत चालत राहिनं.

19 पृथ्वीवर पाणीना भलताच जोर व्हयना अनं त्यानामुये आकाशखालना सर्वा उचा डोंगरं बुडनात.

20 जलप्रलयना पाणी त्यासनावर पंधरा हात चढना; याप्रमानी सर्वा डोंगरं झाकाई गयात.

21 तवय पृथ्वीवर जिवत राहनारा सर्वा प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहनारा सर्वा जिव जंतु अनं सर्वा मानव मरण पावनात.

22 ज्यासना नाकमा जिवनना श्वास व्हता त्या सर्वा कोरडा जमीनवरला जलप्रलयमा सापडीसन मरी गयात.

23 पृथ्वीवर राहनारा सर्वा काही म्हणजे मानव, पशु, रांगनारा प्राणी अनं आकाशमाधला पक्षी या सर्वासना देवनी नाश करा, त्या सर्वा पृथ्वीवरीन नष्ट व्हयनात; नोहा अनं त्यानासोबत ज्या व्हतात तेवढाच मात्र वाचनात.

24 दिडशे दिनपावत जलप्रलयनं पाणी पृथ्वीवर राहिनं.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.