1 Coríntios 13

प्रेम संदेश (AHR)

1 जर मी मनुष्यना अनं देवदूतसना भाषा बोलनु, पण मना आंगी प्रेम नही राहीनं तर मी वाजणारी थाळी अनं झणझणारी झांज असा शे.

2 माले संदेश देवानं दान राहिनं अनी सर्व गुप्त गोष्टी अनं सर्व ज्ञान मनाकडे राहिनं अनी कदाचित मनाकडे डोंगर सरकावाना ईश्वास राहिना, पण मनामा प्रेम नही राहिनं तर मी काहीच नही शे.

3 मी मनं सर्व संपत्ती गरीबसमा दान कराकरता दिधी, मनं शरीर जाळाकरता दिधं, अनी मना आंगे प्रेम नही राहीनं तर माले काहीच फायदा.

4 प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही.

5 चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.

6 अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस.

7 सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.

8 प्रेम कधीच संपस नही; संदेश राहतीन तर ते समाप्त व्हतीन, अनोळखी भाषा राहिन्यात तरी त्या समाप्त व्हतीन; अनी विद्या राहीनी तरी ती संपी.

9 आपलाले थोडसच कळस, अनी देवकडतीन संदेश थोडासाच देता येस.

10 पण पुर्णपणा ई तवय अपुर्णपणा नष्ट व्हई जाई.

11 मी पोऱ्या व्हतु तवय पोऱ्यानामायक बोलु, पोऱ्यासारखी मनी बुध्दी व्हती, अनी पोऱ्यानामायक मना ईचार व्हतात; आते मोठं व्हवानंतर मी धाकलपणन्या गोष्टी सोडी देयल शेतस.

12 आते आमले आरसामा अस्पष्ट दिसस; पण नंतर समोरा समोर दखुत; हाई येळले मनं ज्ञान अपुर्ण शे, पण नंतर पुर्णपणे मी वळखसु, जश देवकडतीन पुर्णपणे माले वळखमा येल शे.

13 आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.