Números 23

marc (MARC)

1 बलाम बालाकाला म्हणाला, “या ठिकाणी माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”

2 बलामाने सांगितले त्याप्रमाणे बालाकाने केले आणि दोघांनी प्रत्येक वेदीवर गोर्‍हा व मेंढा यांचे अर्पण केले.

3 मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू या तुझ्या होमार्पणाजवळ थांब आणि मी जरा बाजूला जातो. कदाचित याहवेह मला भेटायला येतील. ते जे काही मला प्रकट करतील ते मी तुला सांगेन.” मग तो एका उंच ओसाड ठिकाणी गेला.

4 परमेश्वर त्याला भेटले आणि बलाम म्हणाला, “मी सात वेद्या बांधून प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा आणि एक मेंढा अर्पण केला आहे.”

5 तेव्हा याहवेहने बलामाच्या मुखात शब्द घातले व म्हटले, “जा आणि बालाकाला हे वचन सांग.”

6 म्हणून बलाम परत बालाकाकडे आला. तेव्हा तो त्याच्या मोआबी सरदारांसह होमार्पणाजवळ उभा होता असे त्याने पाहिले.

7 तेव्हा बलामाने आपला संदेश सांगितला:

8 ज्यांना परमेश्वराने शाप दिला नाही,

9 खडकाच्या शिखरांवरून मी त्यांना पाहतो,

10 याकोबाची धूळ कोण मोजू शकेल,

11 बालाक बलामाला म्हणाला, “तू मला हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला आणले, पण तू तर आशीर्वाद दिल्याशिवाय काही केले नाहीस!”

12 बलामाने म्हटले, “जे शब्द याहवेह माझ्या मुखात घालतील तेच मी बोलू नये काय?”

13 तेव्हा बालाक त्याला म्हणाला, “माझ्याबरोबर दुसर्‍या ठिकाणी चल जिथून तू त्यांना पाहू शकशील; तुला ते सर्व दिसणार नाहीत तर केवळ त्यांच्या छावणीचा शेवटचा भाग मात्र दिसेल. तिथून त्यांना माझ्यासाठी शाप दे.”

14 त्याने बलामाला सोफिमाच्या मैदानाच्या पिसगाच्या डोंगरावर नेले, तिथे त्याने सात वेद्या बांधल्या आणि प्रत्येक वेदीवर एक गोर्‍हा व एक मेंढा अर्पण केला.

15 बलाम बालाकाला म्हणाला, “तू इथे तुझ्या होमार्पणाजवळ थांब, मी तिथे जाऊन याहवेहशी भेट घेतो.”

16 याहवेह बलामाला भेटले व त्याच्या मुखात आपला शब्द घातला व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि त्याला हे संदेश दे.”

17 जेव्हा तो परत आला तेव्हा तो आपल्या मोआबी सरदारांबरोबर त्याच्या होमार्पणाजवळ उभा असलेला त्याला दिसला. बालाकाने त्याला विचारले, “याहवेह काय म्हणाले?”

18 नंतर त्याने हा संदेश सांगितला:

19 परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी,

20 आशीर्वाद देण्याची आज्ञा मला मिळाली आहे;

21 “याकोबात विपत्ती सापडली नाही,

22 परमेश्वराने त्यांना इजिप्तच्या बाहेर आणले.

23 याकोबाविरुद्ध मंत्रतंत्र नाही,

24 लोक सिंहिणीप्रमाणे उठतात;

25 मग बालाक बलामाला म्हणाला, “त्यांना अजिबात शापही देऊ नकोस किंवा आशीर्वादही देऊ नकोस.”

26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, “याहवेह जे सांगतील त्याचप्रमाणे मी केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

27 नंतर बालाक बलामाला म्हणाला, “चल, मी तुला आणखी एका ठिकाणी नेतो. कदाचित त्या ठिकाणाहून तू माझ्यासाठी त्यांना शाप द्यावा हे परमेश्वराला बरे वाटेल.”

28 आणि बालाकाने बलामाला पेओर डोंगराच्या शिखराकडे ओसाड जागेसमोर नेले.

29 बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि सात गोर्‍हे व सात मेंढे माझ्यासाठी तयार ठेव.”

30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने केले आणि प्रत्येक वेदीवर एकएक गोर्‍हा व मेंढा अर्पण केला.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Números 23, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.