Neemias 11

marc (MARC)

1 आता लोकांचे अधिकारी यरुशलेममध्ये स्थायिक झाले. बाकीच्या लोकातील दहापैकी एकाने यरुशलेम, पवित्र नगरीत येऊन राहावे म्हणून चिठ्ठ्या टाकून त्यांची निवड करण्यात आली, व उरलेल्या नऊ लोकांनी स्वतःच्या नगरात राहावे.

2 यावेळी यरुशलेमला जे स्वखुशीने गेले त्यांचा लोकांनी बहुमान केला.

3 यरुशलेमला येणार्‍या प्रांताधिकार्‍यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला.

4 पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले):

5 मासेयाह, हा बारूखाचा पुत्र, तो कोल-होजेचा पुत्र, तो हजायाहचा पुत्र, तो अदायाहचा पुत्र, तो योयारीबचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र व तो शिलोनी वंशज होता.

6 पेरेसाचे जे वंशज यरुशलेममध्ये राहत होते ते सर्व 468 वीरपुरुष होते.

7 बिन्यामीनच्या गोत्रातील:

8 आणि त्याला अनुसरणारे, गब्बई व सल्लाइ 928 पुरुष.

9 जिक्रीचा पुत्र योएल व हस्सनूआहाचा पुत्र यहूदाह हे शहराच्या नव्या भागावर त्यांचे प्रमुख होते.

10 याजकांपैकी:

11 सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता.

12 आणि त्यांचे मदतनीस, जे मंदिराची सेवा करीत 822 पुरुष या पुढार्‍यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत.

13 आणि त्याचे सहकारी, जे कुटुंबप्रमुख होते ते 242 पुरुष;

14 आणि त्याचे सहकारी, जे वीरपुरुष होते 128.

15 लेवी गोत्रातील:

16 शब्बथई व योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख परमेश्वराच्या भवनाचा बाहेरील कामाचे अधिकारी होते;

17 मत्तन्याह, हा मीखाहचा पुत्र, तो जब्दीचा पुत्र, जो आसाफाचा पुत्र, तो उपकारस्तुतीत व प्रार्थनेत नेतृत्व करणारा प्रमुख होता;

18 पवित्र शहरामधील सर्व लेवी एकूण 284.

19 द्वारपाल:

20 राहिलेले इस्राएली, याजक व लेवीसह यहूदीयाच्या सर्व नगरात, आपआपल्या घराण्यांची वतने जिथे होती, तिथे राहत असत.

21 तरी मंदिराची सेवा करणारे, ज्यांचे पुढारी झीहा व गिश्पा होते, ते सर्वजण ओफेल येथे राहत.

22 यरुशलेमच्या लेव्यांवर व परमेश्वराच्या भवनात सेवेकर्‍यांचा प्रमुख अधिकारी उज्जी, हा बानीचा पुत्र, तो हशब्याहाचा पुत्र, तो मत्तन्याहचा पुत्र, जो मीखाहचा पुत्र होता. उज्जी, हा आसाफाचा वंशज होता. त्याचे कूळ परमेश्वराच्या भवनातील संगीतकार म्हणून सेवा करीत होते.

23 राजाने संगीतकार म्हणून त्यांची नेमणूक केली होती व त्यांचे दररोजचे कार्य निर्धारित केले होते.

24 पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता.

25 यहूदीयाचे लोक राहत असलेली काही गावे व शेती होती, काही लोक किर्याथ-अर्बा व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, दिबोन व त्यांच्या आसपासच्या वस्त्या, यकब्सेल आणि त्यांच्या आसपासची गावे:

26 येशूआ, मोलादाह, बेथ-पेलेट,

27 हसर-शुआल, बेअर-शेबा, आणि त्यांची आसपासची गावे,

28 सिकलाग, मकोनाह व त्यांची आसपासची गावे.

29 एन-रिम्मोन, सोराह, यर्मूथ,

30 जानोह, अदुल्लाम, आणि त्यांच्या आसपासची गावे, लाखीश व त्यांची जवळपासची शेते; अजेकाह, त्यांची गावे; लोकांनी बेअर-शेबापासून हिन्नोमाच्या खोर्‍यापर्यंत वस्ती केली.

31 बिन्यामीन वंशातील लोक खालील ठिकाणी राहत होते: गेबा, मिकमाश, अय्याह, बेथेल, आणि त्यांच्या सभोवतालची गावे,

32 अनाथोथ, नोब, अनन्याह,

33 हासोर, रामाह, गित्ताइम,

34 हादीद, सबोईम, नेबल्लाट,

35 लोद व ओनो व गे-हाराशीम.

36 यहूदीयामध्ये राहणारे काही लेवी बिन्यामीन गोत्राच्या लोकांबरोबर राहण्यासाठी गेले.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Neemias 11, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.