Isaías 39

marc (MARC)

1 त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादानने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजारपणाबद्दल आणि बरे झाल्याबद्दल ऐकले होते.

2 हिज्कीयाहने राजदूतांचे आनंदाने स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते दाखविले—चांदी, सोने, मसाले, उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.

3 तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?”

4 संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?”

5 तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेहचे वचन ऐका:

6 अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व, बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात.

7 आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.”

8 हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभर शांती आणि सुरक्षितता असेल.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 39, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.