Gênesis 3

marc (MARC)

1 आता याहवेह परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व वन्यप्राण्यांमध्ये सर्प सर्वात धूर्त होता. त्याने स्त्रीला म्हटले, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तुम्ही खाऊ नये असे परमेश्वराने खरोखरच म्हटले आहे काय?”

2 स्त्री सर्पाला म्हणाली, “आम्हाला बागेतील झाडांची फळे खाण्याची मुभा आहे.

3 पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ”

4 पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही,

5 कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.”

6 जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले.

7 पण मग त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न असल्याचे त्यांना समजले; नंतर त्यांनी स्वतःसाठी अंजिराच्या पानांची कटिवेष्टने केली.

8 सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.

9 परंतु याहवेह परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, “तू कुठे आहेस?”

10 आदाम म्हणाला, “बागेत मी तुमचा आवाज ऐकला आणि मला भीती वाटली, कारण मी नग्न होतो; त्यामुळे लपून बसलो.”

11 याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

12 त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”

13 तेव्हा याहवेह परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाले, “तू हे काय केलेस?”

14 याहवेह परमेश्वर सर्पाला म्हणाले, “कारण तू हे केलेस म्हणून,

15 तू आणि स्त्री,

16 नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाले,

17 नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता,

18 भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील,

19 ज्यामधून तू घडविला गेलास

20 आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.

21 याहवेह परमेश्वराने आदामासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी चर्मवस्त्रे केली आणि त्यांना ती घातली.

22 नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.”

23 म्हणून याहवेह परमेश्वराने मनुष्याला ज्या भूमीतून निर्माण केले होते तिची मशागत करण्यासाठी त्या एदेन बागेतून घालवून दिले.

24 अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gênesis 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.