Ezequiel 2

marc (MARC)

1 तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.”

2 तो बोलत असताना, आत्म्याने माझ्यामध्ये प्रवेश केला व मला माझ्या पायांवर उभे केले आणि तो माझ्याशी बोलताना मी ऐकले.

3 तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.

4 ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

5 ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.

6 आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस.

7 तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत.

8 परंतु तू हे मानवपुत्रा, मी तुला जे सांगतो ते ऐक. त्या बंडखोर लोकांप्रमाणे तू बंड करू नकोस; तुझे तोंड उघड आणि मी तुला जे देतो ते खा.”

9 तेव्हा मी पाहिले, की एक हात माझ्याकडे पसरलेला होता आणि त्यात एक गुंडाळी होती,

10 ती त्याने माझ्यापुढे उघडली. त्याच्या दोन्ही बाजूंना विलाप आणि शोक आणि दुःखाचे शब्द लिहिलेले होते.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Ezequiel 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.