1 Crônicas 14

marc (MARC)

1 आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले.

2 आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे.

3 यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.

4 यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन,

5 इभार, एलीशुआ, एल्पलेट,

6 नोगा, नेफेग, याफीय,

7 एलीशामा, बिलिआदा व एलिफेलेत.

8 इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला.

9 इकडे पलिष्टी लोकांनी येऊन रेफाईमच्या खोर्‍याला लुटले.

10 तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?”

11 म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम, हे नाव पडले.

12 पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली.

13 पुन्हा एकदा पलिष्टी लोकांनी खोर्‍यात हल्ला केला.

14 तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.

15 तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”

16 तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्याला ठार केले.

17 दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Crônicas 14, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.