Zacarias 13

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 त्या दिवसात दावीदाच्या वंशासाठी आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटेल.

2 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी देशांतील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांस त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुद्ध आत्म्यांचा नायनाट करीन.

3 एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्यास शिक्षा केली जाईल. त्याचे आईवडील ज्यांनी त्यास जन्म दिला ते त्यास म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आईवडील त्यास भोसकतील.

4 त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टांताची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांस फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत.

5 तेव्हा तो म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही! मी शेतकरी आहे; मी लहानपणापासून शेतीच करीत आलो आहे.’

6 पण इतर लोक त्यास विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे वण होत!”

7 सेनाधीश परमेश्वर म्हणतो,

8 परमेश्वर म्हणतो,

9 त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Zacarias 13, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.