Jeremias 30

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 यिर्मयाला परमेश्वरापासून जे वचन आले ते हे आहे आणि म्हणाले,

2 परमेश्वर, इस्राएलाचा देव, जे काही बोलला, तो म्हणतो, “मी तुझ्याशी बोललेले सर्व वचने आपणासाठी पुस्तकात लिहून ठेव.

3 कारण पाहा, परमेश्वराचे हे निवेदन आहे, असे दिवस येतील की, ज्यात मी आपल्या लोकांचे इस्राएल आणि यहूदा यांचे भविष्य प्रस्थापित करील. कारण मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशात त्यांना परत आणीन आणि ते त्याचा ताबा घेतील.” असे मी परमेश्वर म्हणत आहे.

4 इस्राएलाविषयी व यहूदाविषयी ही परमेश्वराने जाहीर केलेली वचने आहेत.

5 कारण परमेश्वर हे म्हणाला,

6 विचारा व पाहा जर पुरुष बालकाला जन्म देईल. प्रत्येक तरुण पुरुषाचा हात प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याच्या कमरेवर दिला आहे हे मी का पाहत आहे?

7 हायहाय! तो दिवस महान आहे, त्याच्यासारखा कोणताही नाही.

8 सेनाधीश परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की, मी तुमच्या मानेवरील जोखड मोडीन आणि तुमची बंधने तोडीन, यापुढे परके तुला गुलाम करणार नाहीत.

9 पण परमेश्वर त्यांचा देव याची आणि दावीद त्यांचा राजा ज्याला मी त्यांच्यावर स्थापीन त्याची ते सेवा करतील.

10 परमेश्वर असे म्हणतो, म्हणून तू याकोबा, माझ्या सेवका, घाबरु नकोस, आणि इस्राएला, हिंमत खचू नको.

11 कारण परमेश्वर असे म्हणतो, मी तुला तारायला तुम्हाबरोबर आहे.

12 कारण परमेश्वर असे म्हणतो, तुझी जखम बरी न होऊ शकणारी आहे; तुझा घाय संसर्गजन्य आहे.

13 तुझा वाद चालवणारा कोणीही नाही; तुझा घाय बरा करण्यासाठी कोणताही उपाय नाही.

14 तुझे सर्व प्रियकर तुला विसरले आहेत. ते तुला शोधत नाहीत,

15 तुझ्या जखमेमुळे तू मदतीसाठी का ओरडतो? तुझ्या यातना बऱ्या न होऊ शकणाऱ्या आहेत.

16 म्हणून जे प्रत्येकजण तुला खाऊन टाकतील ते खाऊन टाकले जातील, आणि तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील.

17 कारण मी तुला आरोग्य देईन; मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. हे परमेश्वराचे निवेदन आहे.

18 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी याकोबाच्या डेऱ्याचे भविष्य परत फिरवीन आणि त्याच्या घराण्यावर दया करीन.

19 नंतर त्यांच्यामधून उपकारस्तुती आणि आनंदोत्सव करणाऱ्यांचा आवाज निघेल,

20 मग त्यांचे लोक पूर्वीच्या सारखे होतील आणि त्यांची मंडळी माझ्यासमोर प्रस्थापित होईल

21 त्यांचा पुढारी त्यांच्यातलाच होईल. तो त्यांच्यामधूनच निघेल

22 मग तुम्ही लोक माझे व्हाल आणि मी तुमचा देव होईन.”

23 पाहा, परमेश्वराचे क्रोधरूप तुफान सुटले आहे. ते तुफान निरंतर आहे.

24 परमेश्वर आपल्या हृदयाचे उद्देश पूर्ण करून सिद्धीस नेईपर्यंत त्याचा संतप्त क्रोध परत जाणार नाही.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 30, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.