Jeremias 2

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,

2 “जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो,

3 इस्राएल परमेश्वरास पवित्र होते, त्याच्या उत्पन्नांचे प्रथम फळ.

4 याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका.

5 परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि,

6 कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे?

7 पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या.

8 “याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही!

9 म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो.

10 कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा,

11 काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी?

12 “आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो.

13 कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.

14 “इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे?

15 तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे.

16 नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत.

17 तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय?

18 तर आता, शिहोराचे पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे?

19 तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर,

20 “कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस,

21 पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले,

22 जरी तू स्वत:ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले,

23 “मी अशुद्ध नाही, मी बआल दैवताच्या मागे गेली नाही” असे तू मला कसे म्हणू शकतेस?

24 जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस.

25 तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर.

26 चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे.

27 हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, “तू माझा बाप आहेस” आणि खडकाला बोलतात की, “तू मला जन्म दिला आहेस.”

28 तर तुम्ही स्वत:साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे.

29 “तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो.

30 “तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही,

31 जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय?

32 कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय?

33 प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस,

34 गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे.

35 या सर्व गोष्टी असूनही उलट तू म्हणतेस, “मी निरपराध आहे. खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे.”

36 तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतीस?

37 आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.