Jeremias 17

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 “यहूदाचे पाप लोखंडी लेखणीने व हिऱ्याच्या टोकाने लिहिलेले आहे.

2 त्यांचे लोक उंच डोंगरावरील हिरव्या झाडाजवळील त्यांच्या वेद्या आणि अशेराचे खांब आठवण करतात.

3 विस्तीर्ण प्रदेशातील डोंगरावरील त्यांच्या वेद्या ते आठवतात. मी तुझी संपत्ती आणि विपुलता दुसऱ्यास लूट अशी वाटून देणार. कारण तुझी पातके तुझ्या सर्व सिमांत सरळीकडे आहेत.

4 मी दिलेला वारसा तू गमावशील.

5 परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो,

6 कारण तो वाळवंटातील झुडुपाप्रमाणे आहे आणि चांगले येईल ते तो पाहणार नाही.

7 परंतु जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादीत आहे, कारण परमेश्वर त्याचा विश्वास आहे.

8 तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे तो होईल, ज्याची मुळे प्रवाहाजवळ पसरते,

9 हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार?

10 मी प्रत्येक मनुष्यास त्याच्या लायकीप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे ताडना करण्यास,

11 अन्यायाने जो श्रीमंत होतो, तो जशी तितर जी अंजी घालत नाहीत त्यावर बसते तसा आहे.

12 आमच्या मंदिराचे ठिकाण एक गौरवशाली राजासन, जे सुरुवातीपासून भारदस्त आहे.

13 परमेश्वरा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस. तू पाण्याच्या जिवंत झऱ्याप्रमाणे आहेस. जो या भूमीवर परमेश्वरा पासून फिरेल, त्यास छेदले जाईल.

14 परमेश्वरा, तू मला बरे कर, आणि मी पूर्ण, बरा होईन. तू मला तार, म्हणजे मी तरेन. कारण तुच माझे स्तुतीचे गीत आहेस.

15 पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.”

16 मी तर तुझ्यामागे चालून मेंढपाळ होण्यापासून मागे हटलो नाही, तो भयंकर दिवस उजाडावा अशी माझी इच्छाही नव्हती.

17 तू मला भयावह असे होऊ नकोस. संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहेस.

18 माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो.

19 परमेश्वराने मला असे म्हटले: “यहूदाचे राजे यरूशलेमेच्या ज्या प्रवेशद्वारातून ये-जा करतात, त्या द्वारात जाऊन उभा राहा आणि लोकांस सांग. मग यरूशलेमेच्या इतर प्रवेशद्वारापाशी जाऊन हेच कर.

20 त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका.

21 परमेश्वर असे म्हणतो: तुम्ही आपला जीव जपा आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही यरूशलेमेच्या प्रवेशद्वारातून ओझी वाहून आणू नका.

22 आणि शब्बाथाच्या दिवशी तुम्ही आपल्या घरातून काही भार बाहेर आणू नका व काही उद्योगही करु नका, तुमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञेप्रमाणे शब्बाथाचा दिवस पवित्र पाळा.

23 पण त्यांनी तो पाळला नाही आणि लक्ष दिले नाही. परंतू ते आपल्या मानेत ताठर झाले, म्हणून ते ऐकेणात आणि शिक्षण आत्मसात करेनात.

24 असे होईल की, जर तुम्ही खचित माझे ऐकाल आणि शब्बाथाच्या दिवस पवित्र पाळण्यासाठी, यरूशलेमेच्या प्रदेशद्वारातून तुम्ही ओझी आणली नाहीत आणि त्या दिवशी काम नाही केले, परमेश्वर असे म्हणतो.

25 तर या नगराच्या दारातून दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे आणि सरदार, रथांमधे व घोड्यावर बसून आत जातील, ते व त्यांचे सरदार, यहूदा आणि यरूशलेमेत राहणारे, आत जातील, आणि हे नगर सर्वकाळ राहीन.

26 ते सर्व यहूदा आणि यरूशलेमेच्या आजूबाजूच्या सर्व प्रदेशातून, आणि बन्यामीनच्या देशातून आणि खालच्या भागातून, डोंगराळ प्रदेशातून आणि नेगेबमधून, होमार्पण आणि धान्यार्पण, यज्ञ व धूप आणतील आणि उपकारस्तुतीची अर्पणे घेऊन लोक परमेश्वराच्या घरास येतील.

27 पण जर तुम्ही शब्बाथ दिवस पवित्र पाळण्यासाठी माझे ऐकले नाही, जर तुम्ही शब्बाथाच्या दिवशी यरूशलेमेच्या दारात ओझे वाहिले, तर मी दारात कधींही विझू न शकणारी आग लावीन, ही आग यरूशलेमचे राजवाडे खाऊन टाकील आणि ती विझवली जाणार नाही.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 17, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.