Jeremias 15

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत.

2 असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो:

3 मी त्यांना चार गटात सोपवून देईन; मारण्यास तलवार, फाडून टाकण्यासाठी कुत्री, आणि आकाशांतले पक्षी व भूमीवरील पशू, परमेश्वर असे म्हणतो.

4 पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरूशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण.

5 हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार?

6 तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस.

7 म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे.

8 मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन.

9 आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल.

10 माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे.

11 परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय?

12 कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?

13 मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन,

14 तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन.

15 परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे.

16 मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली.

17 लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही.

18 माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे?

19 यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील.

20 मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करीन. आणि ते तुझ्याशी लढतील, परंतू तुझ्यावर प्रबल होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे, असे परमेश्वर म्हणतो.

21 कारण मी तुला दुष्टाच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजाच्या हातातून तुला खंडून घईल.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.