Isaías 9

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल.

2 जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे;

3 तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे,

4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा,

5 कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे

6 कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे;

7 त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही,

8 प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे.

9 सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,

10 “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”

11 म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील;

12 पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील,

13 तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.

14 म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.

15 नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.

16 जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.

17 म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही,

18 दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते;

19 सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत,

20 ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत.

21 मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.