Isaías 66

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 परमेश्वर असे म्हणतो,

2 “सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत.” परमेश्वर असे म्हणतो.

3 जो यज्ञासाठी बैल कापतो तो मनुष्यघातकासारखा आहे, जो कोकऱ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान तोडणाऱ्यासारखा आहे.

4 अशाच प्रकारे मी त्यांची शिक्षा निवडेन. ते ज्या गोष्टींना फार भितात तिच त्यांच्यावर आणीन.

5 जे तुम्ही परमेश्वराच्या वचनाने थरथर कापता ते तुम्ही त्याचे वचन ऐका,

6 नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे.

7 “तिला कळा येण्यापुर्वीच ती प्रसूत झाली, तिला वेदना लागण्याच्या आधीच तिला पुरुषसंतान झाले.”

8 अशी गोष्ट कोणी ऐकली काय? कोणी अशी गोष्ट पाहिली आहे काय? एकाच दिवसात राष्ट्र जन्म घेते काय? एक राष्ट्र एका क्षणात स्थापन होईल का?

9 परमेश्वर म्हणतो, मी आईला प्रसूतिच्या वेळेत आणून तिचे मुल जन्मविणार नाही काय?

10 यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा.

11 कारण तुम्ही तिच्या सांत्वनांचे स्तन चोखून तृप्त व्हावे, आणि तिच्या महिम्याच्या विपूलतेचे दूध ओढून घेऊन संतुष्ट व्हावे.

12 परमेश्वर असे म्हणतो “मी तुमच्यावर नदीप्रमाणे हे वैभव पसरवेल,

13 आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल.”

14 तुम्ही हे पाहाल आणि तुमचे हृदय हर्ष पावेल, आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे नवी होतील.

15 कारण पाहा! परमेश्वर अग्नीसहीत येईल, आणि अग्नीद्वारे आपला क्रोध प्रकट करावा, आणि धमकीसोबत ज्वाला निघाव्यात म्हणून त्याचे रथ वावटळीसारखे होतील.

16 कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील.

17 जे डुकराचे मांस खातात व अमंगळ गोष्टी व उंदीर खाऊन,

18 कारण मला त्यांचे विचार आणि कल्पना ठाऊक आहेत. ती वेळ येणार आहे जेव्हा मी सर्व राष्ट्रांना व भाषांना एकत्र करीन. आणि ते येतील व माझे वैभव पाहतील.

19 काही लोकांवर मी खूण करीन. मी या वाचविलेल्या काही लोकांस तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तुबाल, यवान आणि दूरदूरच्या द्वीपात, ज्यांनी माझी कीर्ती ऐकली नाही व माझे वैभव पाहिले नाही त्याच्याकडे पाठवीन. ते राष्ट्रांमध्ये माझे वैभव प्रकट करतील.

20 आणि ते सर्व राष्ट्रांतून तुमच्या भावांना आणतील. ते त्यांना माझ्या पवित्र डोंगरावर, यरूशलेमेला, घोड्यांवरून, खेचरांवर, उंटावरून, रथांतून आणि गाड्यांतून आणतील. ते म्हणजे जणू काही इस्राएलाच्या लोकांनी निर्मळ तबकातून, परमेश्वराच्या मंदिरात आणलेले नजराणे असतील.

21 “ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो.

22 कारण मी जे नवीन आकाशे व पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील.

23 आणि एका महिन्या पासून दुसऱ्या महिन्या पर्यंत, एका शब्बाथापासून दुसऱ्या शब्बाथापर्यंत, सर्व लोक माझ्या समोर नमन करायला येत जातील, परमेश्वर असे म्हणतो.

24 “आणि ज्या मनुष्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला त्यांची प्रेते ते पाहातील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 66, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.