Isaías 57

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 धार्मिक नाश पावतो, पण कोणीच हे विचारात घेत नाही. आणि कराराचे विश्वासू लोक एकत्र जमले, पण कोणासही हे समजले नाही की, धार्मिक दुष्टांमुळे एकत्र झाला आहे.

2 तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो.

3 पण तुम्ही, चेटकिणीच्या मुलांनो, व्यभिचारिणी आणि जाराच्या संतानांनो, इकडे जवळ या.

4 तुम्ही आनंदाने कोणाचा उपहास करता?

5 तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता,

6 नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे, त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहेत.

7 तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.

8 तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले,

9 तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस.

10 तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतू तू कधीही असे म्हटले नाही की, “हे निराशाजनक आहे.”

11 तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस, ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस?

12 मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता,

13 जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मूर्तींचा समुदाय तुला सोडवो.

14 तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा,

15 कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो,

16 कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही.

17 कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो.

18 मी त्याचे मार्ग पाहिले आहेत,

19 आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला,

20 पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही,

21 “पाप्यांस काही शांती नाही.” असे परमेश्वर म्हणतो.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 57, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.