Isaías 42

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः

2 तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही.

3 तो चेपलेला बोरू मोडणार नाही आणि मिणमिणती वातसुध्दा तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय देईल.

4 पृथ्वीवर न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो मंदावणार नाही किंवा धैर्यहीन होणार नाही;

5 परमेश्वर देव हे म्हणत आहे, ज्याने आकाश निर्माण केले आणि त्यास विस्तारीले; ज्याने पृथ्वी पसरली आणि ज्यामध्ये जीवन दिले आहे;

6 मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन.

7 आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिवानांना अंधारकोठडीतून

8 “मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे;

9 पाहा, पूर्वीच्या गोष्टी घडून चुकल्या आहेत,

10 परमेश्वरास नवीन गाणे गा, आणि पृथ्वीच्या शेवटापासून,

11 वाळवंटांनो आणि नगरांनो आरोळी मारा, ज्या खेड्यात केदार राहतो, मोठ्याने आनंदाने ओरडा!

12 त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत.

13 परमेश्वर शूर योध्द्याप्रमाणे बाहेर जाईल; तो युद्धवीरासारखा पुढे जाईल. तो आपल्या आवेशाने उत्तेजित होईल.

14 बराच वेळ मी काही बोललो नाही; मी स्तब्ध राहिलो आणि स्वतःवर संयम ठेवला;

15 मी टेकड्या आणि पर्वत उध्वस्त करीन आणि त्यांचे सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन;

16 मी आंधळ्यांना माहीत नसलेल्या मार्गाने आणीन, त्यांना माहीत नसलेल्या वाटेने मी त्यांना नेईन, मी त्यांच्यापुढे अंधाराचा प्रकाश करीन, वाकडी ठिकाणे सरळ करीन.

17 जे कोणी कोरीव मूर्तीवर भरवसा ठेवतात, ओतीव मूर्तींना म्हणतात,

18 तुम्ही बहिऱ्यांनो ऐका; आणि तुम्ही आंधळ्यांनो, तुम्हास दिसावे म्हणून तुम्ही पाहा.

19 माझ्या सेवकाशिवाय कोण आंधळा आहे? किंवा ज्याला मी पाठवले त्या माझ्या निरोप्यासारखा बहिरा कोण आहे?

20 तुम्ही पुष्कळ गोष्टी पाहता, परंतु त्याचे आकलन होत नाही; त्याचे कान उघडे आहेत, परंतु कोणी एक ऐकत नाही.

21 परमेश्वर आपल्या न्यायीपणामुळे आणि नियमशास्त्र वैभवशाली केल्याने खूश झाला.

22 पण हे लोक लुटलेले आणि लुबाडलेले आहेत;

23 तुमच्यातील याकडे कोण कान देईल? भविष्यात कोण कान देऊन ऐकेल आणि श्रवण करील?

24 याकोबाला लुटीस व इस्राएलास लुटणाऱ्यांस कोणी दिले?

25 म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 42, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.