Isaías 28

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!

2 पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे.

3 एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल.

4 त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे,

5 त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांच्या उरलेल्यांना सुंदर मुकुट असा होईल.

6 आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.

7 पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत.

8 खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.

9 तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल?

10 कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे.

11 खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल.

12 पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात.

13 लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले.

14 याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरूशलेमेवर राज्य करता,

15 तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे.

16 यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो,

17 मी न्याय मोजमापाची काठी,

18 तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल

19 जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल.

20 कारण अंथरूण पाय पसरावयास खूप लहान आहे,

21 जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता,

22 तर आता तुम्ही थट्टा करू नका,

23 मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका,

24 पेरणी करण्यासाठी शेतकरी सतत शेत नांगरतो का?

25 त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो,

26 कारण त्याचा देव त्यास सूचना देतो,

27 शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही,

28 भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही.

29 सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 28, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.