Eclesiastes 1

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 ही शिक्षकाकडून आलेली वचने आहेत, जो यरूशलेमेतील राजा आणि दावीदाचा वंशज होता.

2 शिक्षक हे म्हणतो,

3 भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्यास काय लाभ?

4 एक पिढी जाते,

5 सूर्य उगवतो

6 वारा दक्षिणेकडे वाहतो

7 सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात

8 सर्व गोष्टी कष्टमय आहेत.

9 जे काही आहे तेच होणार,

10 कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल,

11 प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत.

12 मी शिक्षक आहे, आणि यरूशलेमेमध्ये इस्राएलावर राजा होतो.

13 आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत.

14 भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे.

15 जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही!

16 मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.”

17 याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो.

18 कारण विपुल ज्ञानात अधिक खेद आहे आणि जो कोणी ज्ञानात वाढतो तो दुःख वाढवतो.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Eclesiastes 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.