Apocalipse 3

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही:

2 जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.

3 म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही.

4 तरी ज्यांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.

5 जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,

6 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

7 फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः

8 मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर द्वार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस.

9 पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.

10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.

11 मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये.

12 जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.

13 आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

14 लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही:

15 मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते.

16 पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.

17 तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.

18 मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.

19 ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.

20 पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.

21 ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.

22 आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Apocalipse 3, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.