João 7

प्रेम संदेश (AHR)

1 यानंतर, येशु गालीलमा फिरना; यहूदी लोके त्याले माराले दखी राहींतात, म्हणीन त्याले यहूदीयामा फिरावं अस वाटनं नही.

2 यहूदीसना सण म्हणजे मंडपना सण जोडे येल व्हता.

3 यामुये त्याना भाऊ त्याले बोलनात, “तु आठेन निंघीन यहूदीयामा जाय, म्हणजे ज्या कामे तु करस त्या तुना शिष्यसनी बी दखाले पाहिजे.

4 ज्याले कोणले प्रसिध्द व्हनं ऱ्हास तो गुपचुप काहीच करस नही; तु या कामे करस ना तर स्वतः जगले प्रकट व्हय!”

5 त्याना भाऊसनी बी त्यानावर ईश्वास ठेयल नव्हता.

6 यावर येशु त्यासले बोलना, “मनी योग्य येळ अजुन येल नही शे, तुमनी येळ तर सर्वदा उपयोगी शे.

7 जग तुमना व्देष करस नही, तर मना व्देष करतस, कारण त्यासना कामे वाईट शेतस अशी मी त्यासनाबद्दल साक्ष देस.

8 तुम्हीन सणमा जा; मनी योग्य येळ आखो पुरी व्हयेल नही शे, म्हणीन मी आत्तेच या सणले जावाव नही.”

9 अस त्यासले सांगीन तो गालीलमा राहीना.

10 येशुना भाऊ सणमा गयात त्यानंतर तो बी गया; पण कसा, उघडपणे नही, तर गुप्तपणे गया.

11 यावरतीन तो कोठे शे अस म्हणत यहूदी लोके त्याना त्या सणमा शोध करू लागनात.

12 लोकसनी गर्दीमा बी त्यानाबद्दल कुजबूज सुरू व्हयनी कोणी म्हणे, “तो चांगला माणुस शे,” तर कोणी म्हणे, “नही तो लोकसले फसाडस.”

13 तरी यहूदीसना भितीमुये त्यानाबद्दल कोणीच उघडउघड बोलनं नही.

14 मंग जवळपास अर्धा सण व्हवानंतर येशु मंदिरमा जाईन शिकाडु लागना.

15 यावरतीन यहूदी लोकसले आश्चर्य वाटनं अनी त्या बोलनात, “हाऊ माणुस बिना शिक्षण लेता कसा काय ईतला ज्ञानी व्हई गया?”

16 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मनी शिकवण हाई मनी नही, तर ज्यानी माले धाडेल शे, त्या देवनी शे.

17 त्याना ईच्छाप्रमाणे करानं अस जर कोणी मनमा आनं तर हाई शिकवणबद्दल त्याले समजी की, हाई देवपाईन शे की मी मना मननं बोली राहीनु.

18 जो आपला मननं बोलस तो स्वतःनं गौरव करी लेवाले दखस; पण आपले ज्यानी धाडेल शे त्याना गौरव जो दखस तो खरा शे, अनी त्यामा काहीच अधर्म नही शे.

19 मोशेनी नियमशास्त्र दिधं की नही? तरी तुमनामा कोणीच नियमशास्त्र पाळस नही. तुम्हीन माले का बरं मारी टाकाले दखी राहीनात?”

20 लोकसनी गर्दी त्याले बोलनी, “तुले भूत लागेल शे! तुले कोण मारी टाकाले दखी राहीनात?”

21 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी एक चमत्कार करा, त्यामुये तुम्हीन सर्व आश्चर्य करतस.

22 सुंता मोशेपाईन नही शे तर पुर्वजसंपाईन शे, म्हणीन मोशेनी ती तुमले लाई दिधी, अनी तुम्हीन शब्बाथ दिनले पोऱ्यासनी सुंता करतस.

23 मोशेना नियमशास्त्र मोडाले नको म्हणीन मनुष्यना पोऱ्यासनी सुंता शब्बाथ दिनले व्हस, तर मी शब्बाथ दिनले एक माणुसले पुर्णपणे बरं करं म्हणीन तुम्हीन मनावर संताप करतस का?

24 तोंड दखीन न्याय करू नका तर धार्मीकतातीन न्याय करा.”

25 यावरतीन यरूशलेमना लोकसमातीन कितलासनी सांगं, “ज्याले या लोके मारी टाकाले दखी राहीनात तो हाऊच ना?

26 दखा! तो लोकसमा उघड बोलस, अनी त्या त्याले काहीच बोलतस नही! अधिकारीसनी खरच हाऊ ख्रिस्त शे हाई वळखी तर नही ना लिधं?

27 तरी हाऊ कोठेन येस हाई आमले सर्वासले माहीत शे, पण ख्रिस्त ई अनी तो कोठेन ई, हाई कोणलेच कळाव नही.”

28 तवय येशु मंदिरमा शिक्षण देतांना मोठा आवाजमा बोलना, “तुम्हीन माले वळखतस अनं मी कोठला शे हाई बी तुमले खरच माहीत शे ना? तरी मी स्वतः व्हईन येल नही शे, पण ज्यानी माले धाडेल शे, तो खरा शे, तुम्हीन त्याले वळखतस नही.

29 पण मी त्याले वळखस, कारण मी त्यानापाईन शे अनी त्यानी माले धाडेल शे.”

30 यावरतीन त्यासनी त्याले धराले दखं, तरी कोणी त्यानावर हात टाका नही, कारण त्यानी योग्य येळ तोपावत येल नव्हती.

31 तवय लोकसनी गर्दीमातीन बराच लोकसनी त्यानावर ईश्वास ठेवा अनं बोलनात, “ख्रिस्त ई तवय तो ह्यानी करेल चमत्कारसपेक्षा जास्त चमत्कार करी का?”

32 लोकसनी गर्दीमा त्यानाबद्दल अशी कुजबूज चाली राहीनी हाई परूशीसनी ऐकं, अनी मुख्य याजक अनं परूशी यासनी त्याले धराकरता कामदार धाडात.

33 येशु बोलना, “मी आखो थोडा येळ तुमनासंगे शे, मंग ज्यानी माले धाडेल शे त्यानाकडे मी निंघी जासु.

34 तुम्हीन मना शोध करशात, पण मी तुमले सापडावु नही, कारण जठे मी ऱ्हासु तठे तुमनाघाई येवावनार नही.”

35 यामुये यहूदी लोके आपसमा बोलनात, “हाऊ असा कोठे जाई की तो आपले सापडावं नही? तो गैरयहूदी लोकसमा पांगी जायेल आपला यहूदी लोकसकडे जाई अनी गैरयहूदी लोकसले शिकाडी का?

36 तुम्हीन मना शोध करशात तरी मी तुमले सापडावं नही, अनी जठे मी ऱ्हासु तठे तुमनाघाई येवावनार नही, हाई जे त्यानी सांगं ते नेमकं काय शे?”

37 मंग सणना शेवटला म्हणजे महत्त्वना दिनले येशु उभा राहिन मोठा आवाजमा बोलना, “कोणी तिशा व्हई तर त्यानी मनाकडे ईसन पाणी पेवानं.

38 जो मनावर ईश्वास ठेवस त्यानामातीन शास्त्रमा सांगेल प्रमाणे, ‘जिवत पाणीन्या नद्या वाहतीन.’”

39 ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले पवित्र आत्मा मिळणार व्हता त्यासनाबद्दल येशु हाई बोलना; यामुये की पवित्र आत्मानं दान आत्तेपावत देवाई जायेल नव्हतं, कारण येशु अजुन त्याना गौरवमा उचलाई जायेल नव्हता.

40 लोकसना गर्दीमातीन कितला जन ह्या शब्द ऐकीसन बोलनात, “हाऊ माणुस खरोखर संदेष्टा शे!”

41 कितलासनी सांगं, “हाऊ ख्रिस्त शे!”

42 ख्रिस्त दावीदना वंशना अनं ज्या बेथलहेम गावना दावीद व्हता, त्या गावना असा येवाव शे अस धर्मशास्त्रमा सांगेल नही शे का?

43 यावरतीन येशुबद्दल लोकसनी त्या गर्दीमा फुट पडनी.

44 त्यामातीन कितला जन तर त्याले धराले दखी राहींतात, तरी कोणी त्यानावर हात टाका नही.

45 जवय मुख्य याजक अनी परूशीसकडे शिपाई परत वनात, शिपाईसले त्या बोलनात, “तुम्हीन त्याले का बरं आणं नही?”

46 शिपाईसनी उत्तर दिधं, “जसं तो बोलस तसा कोणीच माणुस कधीच त्यानामायक बोलना नही!”

47 परूशीसनी त्यासले सांगं, “तुम्हीन बी फसनात का?

48 अधिकारीसपैकी किंवा परूशीसपैकी एकनी तरी त्यानावर ईश्वास ठेयल शे का?

49 जी हाई लोकसनी गर्दीले नियमशास्त्र माहीत नही, त्या देवना शापमा शेतस!”

50 येशुकडे पहिले ई जायेल निकदेम हाऊ परूशीसपैकीच एक व्हता, तो त्यासले बोलना,

51 “कोणतरी ऐकी लेवाशिवाय अनं तो काय करस यानी माहीती करी लेवाशिवाय आपलं नियमशास्त्र त्याले दोषी ठरावस का?”

52 त्यासनी त्याले उत्तर दिधं, “तु बी गालीलना शे का? शोध करीसन दख की गालीलमा कोणताच संदेष्टा उत्पन्न व्हस नही.”

53 मंग त्या सर्व आपआपला घर निंघी गयात.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar João 7, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.