1 Tessalonicenses 4

प्रेम संदेश (AHR)

1 भाऊसवन अनी बहिणीसवन, शेवट आम्हीन तुमले ईनंती करतस अनं प्रभु येशुमा बोध करतस की, तुम्हीन कसं वागीन देवले खूश करानं, हाई आमनापाईन ऐकी लेयल शे अनी तुम्हीन त्यानामायक वागी राहिनात त्यामा तुमनी वाढ व्हतंच रावाले पाहिजे.

2 कारण प्रभु येशुना अधिकारतीन कोणतं शिक्षण तुमले दिधं ते तुमले माहीतच शे.

3 कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात

4 हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे.

5 अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.

6 कोणी ह्या गोष्टी मोडीसन आपला ख्रिस्ती भाऊसना गैरफायदा उचलाना नही; कारण प्रभु ह्या सर्व गोष्टीसबद्दल शासन करनारा शे, हाई आम्हीन तुमले पहिलेच सांगेल व्हतं अनं बजाडेल व्हतं.

7 कारण देवनी आपलाले अनैतीकतामा जगाले नही तर पवित्रताकरता पाचारण करेल शे.

8 म्हणीन जो कोणी हाई शिक्षणले नकारस तो माणुसना नही, तर तुमले आपला पवित्र आत्मा देणारा देवना नकार करस.

9 भाऊसना प्रेमबद्दल आम्हीन तुमले लिखाणं ह्यानी तुमले गरज नही; कारण एकमेकसवर प्रिती करानी, अस तुमले देवनीच शिकाडेल शे;

10 अनी पुरा मासेदोनियामाधला सर्व ईश्वासणारासवर तुम्हीन ती करीच राहिनात, तरी भाऊसवन, आम्हीन तुमले बोध करतस की, ती आखो करा.

11 शांतीतिन जिवन जगा आपलाच कामवर लक्ष राहु द्या अनी आपला उदर निर्वाहकरता काम कर.

12 अईश्वासी लोकससंगे सभ्यतातीन वागानं म्हणजे तुमले सन्मान भेटी, अनी आपला हातसघाई काम करानं, म्हणजे तुमनी जी गरज शे त्याकरता तुमले कोणवर अवलंबीन राव्हानी गरज नही.

13 भाऊसवन, मरेल लोकसबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले नको अशी आमनी ईच्छा शे, ह्यानाकरता की, ज्यासले आशाच नही असा बाकीना लोकसमायक तुम्हीन दुःखी व्हवाले नको.

14 कारण येशु मरणा अनं परत ऊठना असा जर आपला ईश्वास शे तर तसच येशुमा ईश्वास करनारा ज्या मरेल शेतस त्यासले देव येशुनासंगे लई ई.

15 जे प्रभुनी शिकाडं तेच आम्हीन तुमले शिकाडतस, प्रभुनं येनं व्हवापर्यंत ज्या आपण जिवत राहसुत त्या आपण मरेलसना पहिले जावावुच नहीत.

16 कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन;

17 नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत.

18 म्हणीन ह्या वचनसघाई एकमेकसनं प्रोत्साहन करा.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Tessalonicenses 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.